९ जुलै २०२५ रोजी देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली असून, मुंबईतही या बंदचा मोठा परिणाम जाणवणार आहे. देशातील २५ कोटींहून अधिक कर्मचारी आणि १० प्रमुख कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि खासगीकरणाच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारले आहे.
मुंबईत कोणत्या सेवा बंद राहणार?
बँकिंग आणि विमा सेवा:
मुंबईतील अनेक बँका आणि विमा कंपन्यांचे कर्मचारी बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे कॅश ट्रान्झॅक्शन, चेक क्लिअरन्स, आणि ग्राहक सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे.
पोस्टल सेवा:
टपाल वितरण आणि काउंटर सेवा यावरही परिणाम होऊ शकतो, कारण पोस्टल कर्मचारी बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
वीज आणि सार्वजनिक सेवा:
वीज कंपन्यांचे कर्मचारी बंदमध्ये सहभागी असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. तांत्रिक बिघाड किंवा तक्रारींच्या निवारणास विलंब होऊ शकतो.
सरकारी कार्यालये:
सरकारी कर्मचारी बंदमध्ये सहभागी असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोणत्या सेवा सुरू राहतील?
लोकल ट्रेन आणि BEST बस:
मुंबईतील लोकल ट्रेन आणि BEST बस सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. मात्र, काही प्रमाणात विलंब किंवा गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळा आणि महाविद्यालये:
महाराष्ट्र सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांसाठी सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्था सुरू राहतील, परंतु काही ठिकाणी उपस्थिती कमी राहू शकते.
खासगी कार्यालये, बाजारपेठा:
BKC, लोअर परळ, अंधेरीसारख्या व्यावसायिक भागातील खासगी कार्यालये सुरू राहतील. काही कंपन्या वर्क फ्रॉम होमची सुविधा देतील. दुकानं, बाजारपेठा आणि हॉटेल्सही सुरू राहण्याची शक्यता आहे, परंतु स्थानिक आंदोलना दरम्यान काही वेळ बंद राहू शकतात.
नागरिकांसाठी सूचना
अत्यावश्यक कामे बंदपूर्वी पूर्ण करा.
सार्वजनिक सेवांमध्ये विलंब किंवा अडचणी येऊ शकतात, त्यामुळे प्रवासाची पूर्वतयारी करा.
अनावश्यक प्रवास टाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
भारत बंद मागचे कारण
कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या चार कामगार संहिता, खासगीकरण, सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग आणि कामगार हक्कांच्या कमतरतेविरोधात आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews