पुण्यातील कात्रजमधील गुजर निम्बाळकरवाडी, खोपडे नगर येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. चार वर्षांची भवीका चंदाने ही मुलगी तिसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडण्याच्या अवस्थेत अडकली होती. त्या वेळी योगेश अर्जुन चव्हाण हे पुणे अग्निशमन दलातील कर्मचारी सुट्टीवर होते, परंतु शेजाऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी तात्काळ धाव घेतली.
सकाळी ९:०६ वाजता शेजारी उमेश सुतार यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून चव्हाण यांनी आपल्या गॅलरीतून पाहिले असता, बालिका खिडकीतून खाली पडण्याच्या अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली. दरम्यान, भवीकाची आई मोठ्या मुलीला शाळेत सोडून परत आली होती. चव्हाण यांनी वेळीच फ्लॅटमध्ये प्रवेश करून बेडरूमच्या खिडकीतून मुलीला आत ओढून घेतले आणि मोठा अपघात टाळला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात एक पुरुष “बच्चा गिर रहा है” असे ओरडताना दिसतो, आणि नंतर एक पुरुष व एक महिला खिडकीतून मुलीला आत घेतात.
योगेश चव्हाण यांच्या वेळीच घेतलेल्या धाडसी आणि निःस्वार्थ कृतीमुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले असून, त्यांना खऱ्या अर्थाने हिरो म्हटले जात आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews