उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर भागात गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. बद्रीनाथकडे जाणारी १८ आसनी प्रवासी बस (टेंपो ट्रॅव्हलर) अनियंत्रित होऊन थेट अलकनंदा नदीत कोसळली. बसमध्ये एकूण १८ ते २० प्रवासी होते. या दुर्घटनेत किमान १ प्रवाशाचा मृत्यू झाला असून, सात ते आठ जणांना जखमी अवस्थेत वाचवण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी अफरातफर माजली. एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. अद्यापही १० हून अधिक प्रवासी बेपत्ता असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींमध्ये दोन महिला, दोन लहान मुले आणि काही पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बसमध्ये गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रवासी होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, प्रशासनाला तातडीने मदत आणि शोधकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी सोनार यंत्राचा वापर केला जात आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews