पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील रहिवाशांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटरदरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी, उद्घाटनासाठी नेत्यांची वेळ मिळत नसल्याने पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. यामुळे प्रकल्पाचे लोकार्पण जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यातील या उड्डाणपुलाचे काम जूनमध्ये पूर्ण होणार होते, मात्र पावसामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या आणि नियोजनात बदल झाला. परिणामी, माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानचा पूल वापरासाठी खुला होण्यासाठी अजून किमान एक महिना लागणार आहे.
या विलंबामुळे सिंहगड रस्त्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालक यांना अजूनही कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात जुलै महिन्यापर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर पूल खुला करण्याची मागणी केली असून, वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews
भारतासाठी अभिमानाचा क्षण! अॅक्सिओम-४ मोहिमेत भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा सहभाग
