राजस्थानच्या चूरू जिल्ह्यातील रतनगड भागात भारतीय वायुसेनेचे जगुआर ट्रेनर जेट बुधवारी दुपारी नियमित प्रशिक्षण मिशन दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला आहे. विमानाचा मलबा एका शेतात आढळला असून, दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जोरदार आवाज आणि नंतर धूर व आगीच्या ज्वाळा पाहिल्याचे सांगितले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही नागरी मालमत्ता किंवा नागरिक जखमी झालेले नाहीत.
भारतीय वायुसेनेने या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी नेमण्यात आली आहे. हे वर्षातील तिसरे जगुआर विमान अपघात आहे, याआधी मार्च आणि एप्रिल महिन्यातही अशा घटना घडल्या होत्या.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. वायुसेनेने शहीद पायलट्सना श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews