पुण्यात भाजप नेत्यावर महिला पोलीस निरीक्षकाच्या विनयभंगाचा गुन्हा; काँग्रेसचे आंदोलन

पुण्यात भाजपचे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी शनिवार वाड्याजवळ हा प्रकार घडला. गर्दीचा फायदा घेत कोंढरे यांनी महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला, अशी तक्रार आहे. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर काँग्रेसने कसबा गणपती मंदिरासमोर जोरदार आंदोलन केले. भाजप नेत्यावर कठोर कारवाईची मागणी करत, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला. शिवसेनेसह विरोधकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि कोंढरे यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

प्रमोद कोंढरे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून, गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू असून, हा प्रकार पूर्ण पारदर्शकतेने हाताळला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Follow Us on

Instagram : https://www.instagram.com/janbhavnew

Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews

X Account : https://x.com/Janbhavnews

Read more news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *