नाशिकमध्ये दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपी अटकेत

नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (८ जुलै २०२५) दुपारी साडेबारा वाजता एक धक्कादायक घटना घडली. विशाल वाईन शॉप, दत्त मंदिर बस स्टॉप, त्रिमूर्ती चौक येथे दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, त्यातील एकाने दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मार केला. यात गणपत घरे (रहिवासी – उंटवाडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, गणपत घरे आणि आरोपी समोद कौर हे दोघेही दारूच्या दुकानासमोर बसून मद्यपान करत होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद हाणामारीत बदलला आणि कौरने घरेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात घरेचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही त्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होते आणि दारूच्या नशेतच ही हत्या घडल्याचे उघड झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Follow Us on

Instagram : https://www.instagram.com/janbhavnew

Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews

X Account : https://x.com/Janbhavnews

Read More News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *